भारतभूषण शरदआबा बराटे यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा २२ हजार दिव्यांनी साकारून दीपोत्सव साजरा.


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने वारजे येथे भारतभूषण शरदआबा बराटे मित्रपरिवाराच्या माध्यमातून १०० फूट उंच व ६० फूट रुंद प्रभू श्रीरामाची प्रतिमा २२ हजार दिव्यांनी साकारून दीपोत्सव साजरा केला.

 

यावेळी प्रभू श्रीरामांची भव्य आरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे बंधू, चित्तरंजन भागवत व माजी उपमहापौर, नगरसेवक दिलीप बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व २००० पेक्षा जास्त नागरिकांच्या हस्ते करण्यात आली.

Advertisement

 

या दीपोत्सवात पहिला दिवा हा वारजे येथील नवभारत सोसायटी मध्ये रहाणाऱ्या ७० वर्षीय कारसेवक मा. केशव तुकाराम पोपटी यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आला.

 

या संपूर्ण उपक्रमात ५००० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला. यामधे प्रामुख्याने राहुल कुंजीर, संजय पवार – नातु, सुनील सोमाणी, भरत ओसवाल, तेजस थोरात, श्रीकृष्णदादा बराटे, अरुण बराटे, ऋषिकेश राऊत, नितीन उरीट, दत्ताभाऊ भिलारे, रामदास मोरे, आलम पठाण, कमलाकर गलांडे, सुनील गोरडे, दिलीप जाधवार हे मान्यवर उपस्थित होते.

 

एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक दीपोत्सवात सहभागी होऊन, दिवे प्रज्वलित करण्याची पुण्यातील ही पहिलीच वेळ आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »