ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कर्वेनगर येथे रंगणार दिवाळी पहाट कार्यक्रम.


वारजे पुणे :

दिपावली म्हणजे अंधःकार दूर करून जीवन प्रकाशमय करण्याचा मन प्रसन्न करणारा सण! या मंगल समयी ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन होत असून याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

 

मराठी साहित्यात आपल्या विपुल लेखनातून आपली अवीट छाप सोडणारे निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली देणारा त्यांच्या सुश्राव्य कविता आणि गीतांचा कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Advertisement

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल या ठिकाणी दि. १२ नोव्हेबंर, रविवार, रोजी सकाळी ठीक ६ वाजता हा कार्यक्रम संपन्न होत असून शहरातील सर्व रसिक श्रोत्यांनी याप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती , रा. काँ. कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने केली.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »