वारजे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एक आश्वासक चेहरा : भारतभूषण शरदआबा बराटे


वारजे पुणे : 

समाजसेवेचा वसा घेतलेले युवा नेतृत्व !त्यांनी केलेल्या कार्याचा ‘साद-प्रतिसाद’ ने घेतलेला हा आढावा……

राजकारण असो अथवा समाजकारण प्रतिमा आणि प्रतिभा जितकी महत्वाची असते त्याहीपेक्षा योगदान हे श्रेष्ठ असते. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे युवा नेतृत्व भारतभूषण शरदआबा बराटे.

समाजाभिमुख कार्य करताना नागरिकांचा विश्वास महत्वाचा असतो. त्याहीपेक्षा नागरिकांप्रती समाजाच्या हितासाठी तुमची आत्मीयता अधिक महत्त्वाचे असते, ही आत्मीयता खऱ्या अर्थानि जोपासणारे युवा नेतृत्व भारतभूषण शरदआबा बराटे यांनी त्यांच्या समाज कार्यातून ‘आपला माणूस’चे दर्शन घडविले आहे.

 

सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि अभ्यासू असणारे भारतभूषण यांना घरातून राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याचा वसा लाभलेला असतानाही | स्वकर्तृत्वावर त्यांनी आपले वेगळेपण त्यांच्या सामाजिक कार्यातून सिद्ध केले आहे. त्यामुळेच सर्वांसाठी एक हक्काचा चेहरा म्हणून युवा नेतृत्व भारतभूषण यांच्याकडे पाहिले जाते.

बराटे कुटुंबाचा राजकीय वारसा असतानाही त्यांनी सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अफाट जनसंपर्क आणि नाविन्याची कास धरणारे भारतभूषण यांचे ‘समस्या कोणतीही असू द्या त्याचे तत्काळ निवारण झालेच पाहिजे’ हे तत्य सवैय आहे. त्यामुळेच आजपर्यंत समाजातील

सर्व स्तरातील वर्गाना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात समाज कार्य करताना समाज हे माझे कुटुंब आहे, मीही त्यांचा एक सदस्य आहे. या भावनेमुळे ते समाजमनाचा आरसा बनले आहेत. नागरी समस्या असो किंवा विकासात्मक कामे अथवा नागरिकांना येणाऱ्या अडचणी यासाठी २४ तास उपलब्ध असणारे भारतभूषण हे सर्वांसाठीच आधारवड ठरले आहे. शिक्षण असो किंवा कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य, सांस्कृतिक असे अनेक क्षेत्रात भारतभूषण हे सक्रिय आहेत आणि त्या त्या क्षेत्रात अव्वलही ठरले आहेत. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पसंतीचे स्थान आहे. यातूनच एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून भारतभूषण यांच्याकडे पाहिले जाते.

Advertisement

रोजगाराला चालना….

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतभूषण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सामाजिक उपक्रमांचा प्रारंभ केला त्यातूनच रोजगार मेळावे घेऊन कित्येक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. युवकांना योग्य वेळी रोजगाराची संधी मिळाल्यास त्या युवकाचा जसा विकास होतो, तसाच तो त्याच्या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा विकास खऱ्या अर्थाने साध्य होतो या तत्त्वाने भारतभूषण आणि त्यांचा मित्र परिवार कार्यरत आहे. मात्र या उपक्रमामागील त्यांचे उद्देश आणि विचार हेच समाजाला भावले आहे. खच्या अवनि रोजगाराला चालना देणारा युवा नेता असे त्यांच्या बाबतीत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

स्वच्छतेवर भर….

आपला परिसर हा स्वच्छ असला पाहिजे तरच प्रत्येकाचे आरोग्य जपले जाईल. या हेतूने कार्यरत असणारे भारतभूषण व त्यांचा मित्र परिवार आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी उत्तम समन्वय साधून असतात. इतकेच नाही तर त्यांच्यासमवेत एक माणूस म्हणूनही कार्य करतात. मात्र माणुसकी कायम जोपासतात. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेत ‘आपला माणूस’ म्हणून त्यांना आदराचे स्थान आहे. स्वच्छतेचे महत्व पटाये आरोग्याप्रती सजग रहावे आणि केवळ नागरिक नाही तर स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी ते विविध उपक्रमही राबवत असतात. शिवजयंतीनिमित्त त्यांनी रयतेचे राज्य महोत्सवात स्वराज्याचे स्वच्छता ‘सैनिक सन्मान सोहळा’ घेऊन सर्व कर्मचारीवर्गाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली हे विशेष. श्रमदान स्वच्छता मोहीम वेळोवेळी राववून जनजागृती करण्यातही भारतभूषण आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच अग्रेसर राहिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »