महिलांच्या ‘शक्ती’ राष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद


‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ‘(इशरे) च्या परिषदेत मंथन

पुणे :

‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ‘(इशरे) च्या वतीने ‘शक्ती ‘ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते कार्बनीकरण कमी करण्यासाठी ऊर्जा सक्षम,पर्यावरण पूरक तंत्रज्ञान वापरण्यासाठी , ‘हिटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग’ या क्षेत्रातील महिलांच्या योगदानावर चर्चा करण्यासाठी आणि सर्व स्तरात जागृती घडवून आणण्यासाठी ही परिषद झाली . या परिषदेनंतर ‘गो ग्रीन,गो स्मार्ट’ संदेश देणारा ‘एसीआर ट्रेंड्झ २०२३-२०२४ ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

हॉटेल टिपटॉप (वाकड) येथे झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.’शक्ती’परिषदेत थरमॅक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी,स्मिता पाटील,सुनीता पुरुषोत्तम,मेजर वंदना शर्मा,अल्पा शाह,डॉ.कीर्ती केळकर,स्तुती गुप्ता,अश्विनी शिंगोटे,अवनी शाह,सोनाली धोपटे सहभागी झाल्या.’एसीआर ट्रेंड्झ २०२३’या कार्यक्रमामध्ये मुकुंद रानडे,आशिष रखेजा,अरविंद सुरंगे,रमेश परांजपे,विमल चावडा ,के.रामचंद्रन,डॉ.राजगोपालन,अनुप बल्लानी,एन.जयंती,मनीष गुलालकरी,नंदकिशोर कोतकर,आशुतोष जोशी,चेतन ठाकूर,वीरेंद्र बोराडे,सुभाष खनाडे,सिम्पल जैन,सुजल शाह,निकिता साहुजी सहभागी झाले.

२७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दोन्ही कार्यक्रमात विविध विषयावर विचार मंथन करण्यात आले.अभियंते, तंत्रज्ञ, सल्लागार,कंत्राटदार,उद्योजक,शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी अशा पाचशेहून अधिक जणांचा समावेश होता.उपयुक्त तंत्रज्ञान,उपकरणांचे प्रदर्शन या परिषदेत मांडण्यात आले होते.

इमारती,रुग्णालये,शाळा,मॉल,महाविद्यालये,विमानतळे,फॅक्टरी अशा ठिकाणी हीटिंग आणि कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातील आधुनिक तंत्रांवर चर्चा झाली .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »