वारज्यातील श्रीराम प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांसाठी दिवे घाटात योगिनी एकादशी निमित्त राजगिरा लाडू चे वाटप..
साद -प्रतिसाद ऑनलाईन..
जगातील सर्वात मोठा सोहळा आषाढी एकादशी वारी ..या सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वारकरी संप्रदाय वाट पहात असतो.
पावसाच्या सरींची बरसात, सुखावणारा टाळ ,आणि मृदुंगाचा गजर खांद्यावर भगवा पताका, हाती चिपळ्या मनात विठुरायाची ओढ चेहऱ्यावर दिसून येत होती.मुखी हरिनामाचे गोड अभंग गात भक्तिरसात चिंब भिजलेल्या पंढरपूर चे दिशेनं प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात दिवेघाटात वारजे माळवाडी येथील श्रीराम प्रतिष्ठान अखिल गणेशपुरी सोसायटी रामनवमी उत्सव यांच्या तर्फे भक्तिभावात रंगून 7000 राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठान चे संतोष मोदी, महेश माताळे, देविदास शेट्टी, राज बडदे, प्रशांत महानवर, श्रवण चव्हाण, भीमराव पाटील ,मंगेश नवघणे हे सर्व उपस्थित होते, या कार्यक्रमाचे नियोजन परशुराम यादव यांनी केले होते.