स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांनी आयोजित केलेल्या वारजे आयडॉल २०२४ कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा …


मागील तीन दिवसापासून सुरू  असलेल्या वारजे आयडॅाल २०२४ कराओके गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भिमराव ( अण्णा ) तापकीर यांच्या शुभहस्ते पार पडला.

या स्पर्धेस जवळपास २५० ऑनलाईन , ऑफलाईन नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांपैकी १५० स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला . यापैकी ३० स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून या ३० पैकी ७ क्रमांक या गायन स्पर्धेत काढण्यात आले आणि ४ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली .


यंदा प्रथमच आयोजन केलेल्या वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे या गायिका ठरल्या . द्वितीय क्रमांक प्रिती वाटे , तृतीय क्रमांक करण गायकवाड , चतुर्थ क्रमांक साई तामकर , पाचवा क्रमांक सुगंध पंडित , सहावा क्रमांक मोनिका ओड , सातवा क्रमांक भीमा पंडित , अश्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने वारजे आयडॅाल २०२४ हा पुरस्कार पटकावला .

Advertisement

या गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभास मा. आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्यासह गणेश वरपे अध्यक्ष खडकवासला , सचिन मोरे अध्यक्ष खडकवासला , मा. प्रभाकर भोरकडे जिल्हा परिषद सदस्य , नाट्य परिषदेचे खजिनदार अशोक जाधव , सुप्रसिद्ध गायक अनिल घाडगे , गायक संजय मरळ , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , आकांक्षा नारी मंच अध्यक्ष मनीषा दांगट , खडकवासला अध्यक्ष भावना पाटील , राष्ट्रवादीचे देवेंद्र सूर्यवंशी , मा. रजनी पाचंगे , सुभाष अग्रवाल , चुनीलाल शर्मा , चेकमेट टाइम्सचे धनराज माने यांच्यासह संयोजन समितीचे फिल्म निर्माता राजीव पाटील , निवेदक अशोक उनकुले यांच्यासह स्पर्धक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अशोक जाधव , संजय मरळ , जितेद्र भुरूक , अनिल घाटगे यांनी काम पाहिले . सुत्र संचालन अशोक ऊनकुले , चंद्रकांत पंडीत यांनी केले .

या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत नगरसेवक यांनी केले होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »