खासदार मेधाताई कुलकर्णी यांचा स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांच्या भाजपा कार्यालयात विविध मान्यवरांशी संवाद !! 


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

३५ – बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांचे प्रचारार्थ वारजे परिसरातील विविध मान्यवरांच्या प्रत्यक्ष भेट घेत आज खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी उपस्थित राहिल्या होत्या.

वारजे परिसरातील समाजात चांगले काम करणारे, समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसोबत मेधाताईंनी संवाद साधत असताना प्रचार यंत्रणा बाबतची माहिती घेतली . प्रचार करणे बाबतच्या सूचना करून सर्वांनी सुनेत्रावहिनींचे घड्याळ चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन मेधाताईंनी सर्व मान्यवरांना केले . याप्रसंगी अनेक महिला भगिनींना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत महिला भगिनींशी संवाद साधला .

Advertisement

याप्रसंगी युवा नेते परिक्षितभैय्या थोरात , ब्राह्मण महासंघाचे मंदार रेडे , वारजे माळवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माणिकशेठ दुधाने , मार्टचे बाळासाहेब बराटे . हभप दिलीपभाऊ बराटे , वारजे माळवाडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी , अजित कुलकर्णी , सवंगडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उल्हास रानडे , सचिव श्रीकांत गुळवणी , सुरेश तुरे , मराठवाडा सेवा संघाचे निळकंठ शेळके , युनिटी मेडिकल स्टोअर्सचे सागर पायगुडे, शंकर देवस्थान ट्रस्टचे कौस्तुभ बोरकर , उत्तर भारतीय आघाडीचे अशोक मिश्रा , युवा नेते मनोज बराटे , सचिन सुकाळे , राष्ट्रवादीचे संतोष बराटे , बंडूशेठ तांबे , मातृशक्तीच्या वंदना नवघरे , भाजपा पदाधिकारी मेघना काळे , सुभाष अग्रवाल , ऋषिकेश रजावात , व्यंकटेश दांगट यांच्यासह स्वच्छता कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

याच दरम्यान खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी यांनी ॲानलाईन न्युज पोर्टलचे प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकार यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांचे सोबत संवाद साधला .

याप्रसंगी चेकमेट टाईम्सचे धनराज माने , न्युजमेकर लाईव्हचे माऊली म्हेत्रे , साद-प्रतीसादचे राजीव पाटील , दैनिक सकाळचे महादेव पवार , बजरंग लोहार , दैनिक लोकमतचे सचिन सिंग , सलीम शेख , दैनिक पुढारीचे प्रदीप बलाढे , दैनिक राष्ट्रसंचारचे अतुल पवळे आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट मा.स्वीकृत नगरसेवक पुणे मनपा यांनी केले होते .

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »