गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचा आठवा वर्धापन दिन किल्ले सिंहगडावर संपन्न..
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
गड किल्ले संवर्धन संस्थेचा आठवा वर्धापन दिनाचा कार्यक्रम दिनांक २१\०४\२०२४ रविवार दिवशी किल्ले सिंहगडवरील रहिवाशी व घेरा सिंहगड ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजनाने करण्यात आली. या नंतर गडावरील नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे स्मारकाचे पुजन, छत्रपती राजाराम महाराज समाधीचे पुजन झाल्यानंतर गडावरील गडदेवांचे पुजन करण्यात आले. यानंतर गडावरील शाहीर संभाजीराव डिंबळे यांनी छत्रपती शिवराय व नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांचे शौर्य सांगणारा जीवनावरील पोवाडा सादर करण्यात आला.
यंदाच्या वर्षी वर्धापन दिनाचे वेगळेपण म्हणजे संस्थेच्या वतीने सिंहगडावर पुर्वापार पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या व सिंहगडाची सेवा करणाऱ्या रहिवाशी कुटुंबातील माता महिलांना सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ.शांताबाई विश्वनाथ मुजूमले, सौ. सिमा अमोल पढेर, सौ.संगीता एकनाथ मंडले, सौ.कल्पना शिवाजी चव्हाण, सौ.सोनाली शांताराम लांघे या माता महिलांना संस्थेच्या वतीने हिरकणी सन्मान २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.पंचायत समिती सदस्य.श्री दत्ताभाऊ जोरकर, मा. वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पांडुरंग सुपेकर , कोंढणपूर गावचे मा. सरपंच विश्वनाथ मुजूमले पाटील, सरदार डिंबळे घरान्याचे संतोष डिंबळे सरपाटील, घेरा सिंहगड मा. उपसरपंच अमोलभाऊ पढेर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी नाना चव्हाण, तुषार मंडले, शिवव्याख्याते ओमकार यादव,ओमकार पढेर, विठ्ठल पढेर, पन्हाळकर मामा तसेच स्थानिक ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.