ढोल पथकातील वादक ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात दिग्दर्शक मनीष शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास.


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

ढोल पथकातील वादक ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात दिग्दर्शक मनीष शिंदे यांचा थक्क करणारा प्रवासाबद्दल साद प्रतिसादचे संपादक राजीव पाटील यांनी घेतलेला आढावा

 

१.आपण मूळचे कुठले?आपल्या घरी कोण कोण असत?

मी मुळचा पुण्यामधील मुळशी तालुक्यामधील विठ्ठलवाडी, पौड गावाचा. माझ्या घरी मी, आई वडील आणि माझी पत्नी असते. माझ्या वडिलांचा इलेकट्रीक चा व्यवसाय आहे. चित्रपट किंवा कला क्षेत्राशी तसा घरातील कोणाचा संबंध नाही. चित्रपट निर्मिती मध्ये येणे हा माझ्यासाठी एक योगायोग म्हणता येईल.

२. चित्रपट क्षेत्राशी तुमचा संबंध कसा जुळला ?

खरंतर ह्या प्रश्नाचे उत्तर खूप मजेशीर आहे. कॉलेज मध्ये असताना मी तसा मनमौजी होतो. तसेच सुरुवातीला चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या गोष्टीकडे वळू लागलो. परंतु नशिबाने त्यावेळी मी पुणे येथील रुद्ररूपम ह्या ढोल पथकाच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर माझ्या जिवनामध्ये एक नवीन वळण आले. मला कला क्षेत्राबद्दल आवड निर्माण होण्यास सुरुवात झाली. ह्याच काळात मी एका कॅफे मध्ये काम करायचो. तिथे रोज टीव्ही वरती गाणी बघून माझी ह्या क्षेत्राबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत गेली.

३. पहिल्यांदा तुम्ही कॅमेरा किंवा चित्रपटाचे शूटिंग कधी बघितले ?

एकदा सलमान खान ह्यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट बजरंगी भाईजान ह्या चित्रपटामधील मधील सेल्फी लेले ह्या गाण्यासाठी त्यांनी रुद्ररूपम ढोल पथकाशी संपर्क केला. तेव्हा गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये पहिल्यांदा मला कॅमेरा किंवा चित्रपटाचे चित्रीकरण कसे होते, त्यामध्ये किती लोकांची मेहनत असते, तंत्रज्ञानाचा किती वापर होतो इत्यादी गोष्टींचा अनुभव घेता आल. त्यावेळी मला चित्रपट निर्मिती बद्दल प्रेम निर्माण झाले आणि मी तिथेच ठरवले कि आता वापस पुण्याला गेल्यानंतर आपन दिग्दर्शन क्षेत्रामध्येच काम करायचे.

४. दिग्दर्शनाची सुरुवात कशी झाली ? आपण कुठे प्रशिक्षण घेतले का ?

सुरुवातीला मी यूट्यूब इत्यादी साधनांचा वापर करून शिकण्याचा प्रयत्न केला परंतु परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे ह्यासाठी मि पुणे येथील डेक्कन एज्यूकेशन सोसायटी च्या फिल्म अँड टेलीव्हीजण इन्स्टिटयूटमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून माझ्या दिग्दर्शन प्रवासाला खूप प्रेरणादायी वळण मिळाले. तिथे मला दिग्दर्शन क्षेत्रातील बारकावे तर कळलेच परंतु शिस्त आणि टीम वर्क ह्या गोष्टींचे महत्व पण समजले

५. तुम्हाला पहिले काम कधी मिळाले? तो अनुभव कसा होता?

Advertisement

२०१६ ला डेक्कन एज्यूकेशन सोसायटी मधू उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर थोडा काळ काम शोधन्यामध्ये गेला. ह्यावेळी सुद्धा मला रुद्ररूपम ढोल पथकाच्या एका सहकाऱ्यांकडून एका राजकीय व्यक्तीच्या प्रचाराचे काम मिळाले. काही काळानंतर मला छत्रपती शासन ह्या चित्रपटासाठी असोसिएट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ह्या चित्रपटामुळे माझे तांत्रिक ज्ञान अजून घट्ट होत गेले. त्यानंतर मी सहायक दिग्दर्शक म्हणून पगलया नावाचा चित्रपट केला ज्याला १०० अधिक पारितोषिके मिळाली. हा चित्रपट मराठी आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झाला. २०२० मध्ये मिळालेला इलू इलू हा चित्रपट खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला मोठा प्रोजेक्ट ठरला. ह्या चित्रपटामध्ये मी क्रीएटीव्ह दिग्दर्शक म्हणुन काम केले. नुकताच ह्या चित्रपटाला अमीर खान प्रोडक्शन्स नि घेतले असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर २०२२ ला मला एका मराठी म्युझिक चॅनेल सोबत १० गाण्यांचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आणि सगळी गाणी लोकप्रिय झाली. आणि सध्या माझे दिग्दर्शक आणि लेखक म्हणून २ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याच बरोबर प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला अंडर १८ ह्या चित्रपटासाठी मी क्रिएटिव्ह हेड म्हणून कामगिरी बजावली आहे.

६. येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा क्षेत्रात चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा आणि मराठवाड्यामधील कलाकारांना संधी देण्याचा काही विचार आहे का ?

निश्चितच मला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यावरती आणि स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या योगदान ह्या दोन गोष्टींवरती काम करायची इच्छा आहे. त्याचबरोबर माझी अशी धारणा आहे कि मराठवाड्यामधील कलाकार हे खूप मेहनती, हुशार आणि सर्जनशील असतात त्यामुळे चित्रपट क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांचे भविष्य उज्वल आहे. त्याच बरोबर माझ्या आगामी अंडर १८ ह्या चित्रपटाचे ऑडिशस आम्ही मराठवाड्यात घेणार आहोत तर जास्तीत जास्त कलाकारांनी त्यात सहभागी व्हावे. चित्रपट निर्मिती क्षेत्राशी निगडित आणखी मार्गदर्शन पाहिजे असल्यास पुणे येथील माझ्या कार्यालयास पण भेट देऊ शकता. मी नेहमीच होतकरू कलाकारांची शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.

७. चित्रपट क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल ?

ह्या क्षेत्रामध्ये संघर्ष भरपूर आहे त्यामुळे सातत्य ठेवणे, नेहमी शिकत राहणे, वैविध्यपूर्ण चित्रपट बघणे, आणि सय्यम ठवणे ह्या गोष्टीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील लोकांशी संपर्क बनविणे आणि ते टिकउन ठेवणे हे हि तेवढेच महत्वाचे आहे. सुरुवातीपासूनच जर एका गोष्टीमध्ये लक्ष देऊन प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळत जाईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »